Please wait While loading

बालरोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर

Date: 15, Aug, 2019

बालरोग विभागातर्फे स्वातंत्र्यदिनानिमीत्त १५ ऑगस्ट २०१९ रोजी बालरोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये एकूण ११८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. वारंवार आजारी पडणारी मुले, बाल अस्थिरोग, बालहृदयरोग,उंची व वजन वाढणे, वयात येण्याच्या  समस्या इ. आजारांवर या शिबिरात उपचार व मार्गदर्शन करण्यात आले, मोफत औषधे देण्यासाठी बालआंतरग्रंथीतज्ञ डॉ. संध्या कोंडपल्ले व बालअतिदक्षता तज्ञ डॉ. अविनाश शेळके व डॉ. विनोद इंगळे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले.

*Click on image to view.

माणिक हॉस्पिटलमध्ये आहारविषयक मार्गदर्शन शिबीर व आहार स्पर्धा

Date: 15, Sep, 2019
१५ सप्टेंबर २०१९ रोजी हॉस्पिटलमध्ये आहारविषयक मार्गदर्शन व शिबीर स्पर्धा आयोजित करण्यातआली.यात १६ जणींनी सहभाग नोंदवून प्रथियुक्त पदार्थांचा वापर करून निरनिराळे पदार्थ ठेवण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीशे देण्यातआले. तसेच शासकीय वैद्कीय महाविद्यालयातील आहारतज्ञ मंजू मंठाळकर व माणिक हॉस्पिटलमधीलआहारतज्ञ अंजू खंडेलवाल  यांनी महिलांच्या जीवनातील "आहाराचे महत्व" या विषयावर मार्गदर्शन केले.आयुष्यातील निरनिराळ्या टप्यांवर आहारचे महत्व याविषयी 'स्लाईड प्रेसेंटेशनच्या' माध्यमातून विस्तृत माहिती दिली. ७० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
*Click on image to view.

शारदोत्सव

Date: 05, Oct, 2019


प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्रातील शेवटच्या तीन दिवशी म्हणजेच दि.०५, ०६ व ०७ ऑक्टोबर २०१९ रोजी रुग्णालयातील सर्व महिला डॉक्टर , स्टाफ व चतुर्थ श्रेणी कर्मचार्यासाठी शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त फॅन्सी ड्रेस, अंताक्षरी इ. विविध स्पर्धांचा सर्वानी मनमुराद आनंद लुटला.तसेच "मुक्‍ती सोपान" वृद्धाश्रमाच्या संचालक श्रीमती मालती करंदीकर यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठांचे आपल्या जीवनातील महत्व, ज्येष्ठ रुग्णाच्या  शारीरिक , मानसिक, सामाजिक गरजा व त्यांचीकाळजी कशी घ्यावी , त्यासाठी लागणारे वर्तनातील बदल याबद्दल सत्य घटनांचा दाखला  देत उपयुक्‍त मार्गदर्शन केले.


*Click on image to view.

अस्थिरोग तपासणी शिबीर

Date: 06, Oct, 2019


६ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. एकूण ९५ पेशेंटनी या शिबिराचा लाभ घेताना सांधेदुखी व हाडांच्या अनेक समस्यांवर या शिबिरात उपचार व सर्व पेशंटना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हाडांच्या ठिसूळेतेचे प्रमाण तपासण्यात आले व व्यायाम विषयक मार्गदर्शन व सविस्तर माहिती देण्यात आली. अस्थिरोगतज्ञ श्री आशिष नावंदर व  फ़िजिओथेरिपिस्ट श्रीमती कोमल कसबे यांनी या शिबिरात तपासणी व मार्गदर्शन केले.

*Click on image to view.

पक्षाघात दिनानिमित्त माणिक हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम

Date: 29, Nov, 2019


२९ ऑक्टोंबर हा सर्व जगात " स्ट्रोक डे " म्हणजे "पक्षाघात दिवस" म्हणूनओळखला जातो. त्याचेच निमित्त साधून माणिक हॉस्पिटल येथे रविवार दि.०३ नोव्हेंबर २०१९ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.

प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्द फिजिशीयन डॉ. आनंद कडेठाणकर यांची उपस्थिती होती. हॉस्पिटलचे मेंदू विकारतज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांनी स्लाईडशोच्या माध्यमातून "पक्षाघाता"ची लक्षणे, त्यावरील उपचार व "Golden Hour" विषयी माहिती दिली. पक्षाघाताची लक्षणे लवकर लक्षात घेऊन ताबडतोब उपचार केल्यास काही पक्षाघाताचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात व याविषयी जनजागृती करणे अतिशय महत्वाचे आहे. याविषयी त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात श्रोत्यांना माहिती दिली. अशा प्रकारे बरे झालेल्या काही रुग्णांनी यावेळी आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमासाठी संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले, इतर सर्व डॉक्टर्स, स्टाफ,पेशंट इ.ची उपस्थिती होती.

*Click on image to view.

जागतिक मधुमेह दिन व बालदिन

Date: 14, Dec, 2019

दिवसेंदिवस प्रौढांबरोबर लहान मुलांमधील डायबेटीसचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. लहान मुलांमधील डायबेटीसची कारणे , लक्षणे व उपचार हे मोठयांपेक्षा निराळे असतात.

"जागतिक मधुमेह दिन" व "बालदिनाचे" औचित्य साधून दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी माणिक हॉस्पिटल येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बालमधुमेही व त्यांचे पालक यांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमामध्येबालआंतरग्रंथी तज्ञ डॉ. संध्या कोंडपल्ले यांनी मुलांनी व त्यांच्या पालकांनी घेण्याचीसर्वसाधारण काळजी , इन्शुलिनचे महत्त्व इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले तरआहारतज्ञ अंजू खंडेलवाल यांनी मधुमेहातील आहाराविषयी स्लाईडशोच्यामाध्यमातून माहिती दिली. तसेच लहान मुलांमधील डायबेटीस बद्दल मार्गदर्शन व रेकॉर्डबुक प्रत्येक पेशंटला देण्यात आले. त्यानंतर सर्वाची तज्ञांकडून तपासणी HbA1C तपासणी व पुढील गुंतागुंत टाळण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.

*Click on image to view.